प्रेयसीसोबत भांडण झाल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या

तरूणाची धावत्या रेल्वेसमोर आत्महत्या 

Updated: Aug 1, 2018, 12:30 PM IST
प्रेयसीसोबत भांडण झाल्याने तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या title=

कल्याण : प्रेयसीसोबत भांडण झाल्यामुळे राजेश भंडारी या तरूणाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी राजेश भंडारीने सुसाईड व्हिडिओ तयार केला होता. २६ जुलैला विठ्ठलवाडी स्टेशनवरच या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही हाकलून दिलं होतं. मात्र त्यानंतर राजेशने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं.

आत्महत्येपूर्वी सुसाईड व्हिडीओ किंवा फेसबूक लाईव्ह करण्याचं प्रमाण वाढत आहे. पोलिसांनी सुसाईड व्हिडिओच्या आधारे तपास सुरू केला आहे. ती तरुणी कोण आहे जिच्यामुळे राजेशने आत्महत्या केली याबाबत आता चर्चा सुरु आहे.