Crime News: ...म्हणून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली

Dombivli Crime News : ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. 

Updated: Mar 28, 2023, 08:32 PM IST
Crime News: ...म्हणून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली title=

Dombivli Crime News : डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकाची मुजोरी समोर आली आहे. एका रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं तसंच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. डोंबिवलीच्या इंदिरा चौकातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ सोमवारी रात्री साडे अकरा वाजताची ही घटना आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, अद्याप रिक्षा चालकाला अटक झालेली नाही (Dombivli Crime News ). 

गणेश तांबे असे मारहाण झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. गणेश हा सोमवारी  रात्रीच्या वेळेस रिक्षाने प्रवास करत होता. रात्रीची वेळ असल्याचे कारण देत रिक्षा चालकाने दुप्पट पैसे मागितले. या विरोधात गणेश तांबे याने  रिक्षा चालकाला विचारणा केलीय.
याचा राग डोक्यात ठेवून रिक्षा चालकानं तांबे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी फेरीवाल्याने ऍम्ब्युलन्स चालकाला मारहाण केल्याची घटना ताजी असताना रिक्षा चालकाने प्रवाशाला मारहाण केल्याची  घटना समोर आल्याने डोंबिवली दहशदीचे वातावरणात पसरले आहे.

डोंबिवलीतील फेलीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक

डोंबिवलीमधील फेरीवाल्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यांपूर्वी मनसे आमदार राजू पाटील यांनी स्टेशन परिसरात फेरीवाला हटवण्यासाठी महाकालिकेला 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र, आता ही मुदत संपल्यानंतर मनसेने स्टेशन परिसरात "आता आमच्याकडे दुर्लक्ष करा" अशा आशयाचा बॅनर लावून फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. 
महापालिकेला दिलेला अल्टीमेटम संपला असून आता आम्ही आमच्या पद्धतीने फेरीवाला हटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे. स्टेशन परिसराच्या 150 मीटरच्या परिसरात फेरीवाले असू नये असा न्यायालयाचा आदेश आहे. मात्र, तरीसुद्धा महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने आता मनसे आपल्या पद्धतीने स्टेशन परिसर फिरवला मुक्त करेल असा इशारा मनसेने दिला आहे.