औरंगाबादमध्ये युतीत पहिली ठिणगी, भाजपने काम केले नाही - चंद्रकांत खैरे

 भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी औरंगाबादमध्ये पडण्याची शक्यता आहे.  

Updated: May 4, 2019, 07:43 PM IST
औरंगाबादमध्ये युतीत पहिली ठिणगी, भाजपने काम केले नाही - चंद्रकांत खैरे title=

औरंगाबाद : भाजप-शिवसेना युतीत पहिली ठिणगी औरंगाबादमध्ये पडण्याची शक्यता आहे. रावसाहेब दानवे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप शिवसेना नेते आणि उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

भाजप - शिवसेना युतीत पहिली ठिणगी औरंगाबादेत पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधात काम केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांनी आदेश देऊनही दानवे आणि त्यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यासाठी काम केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

औरंगाबाद भाजपानं खैरे यांचे आरोप फेटाळलेत. निकाल आल्यावर भाजपने किती काम केले आहे, ते कळेल असा दावाही भाजपने केला आहे. औरंगाबादचा निकाल युतीला अनुकूल न लागल्यास त्याचे मोठे परिणाम राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खैरे यांचा पराभव झाल्यास युतीचा धागा औरंगाबादपासून उसवायला सुरुवात होईल, अशी चर्चा आहे.