औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण बैठकीत आज अभूतपूर्व गोंधळ आणि हाणामारी झाली आहे.
वंदे मातरमच्यावेळी एमआयएमचे नगरसेवक उभे न राहिल्यानं शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
या वरूनच झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर पुढे घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं. याच गोंधळात पालिकेच्या सभागृहातील माईकही तोडण्यात आले आहेत.
एमआयएमच्या नगरसेवकांनी पूर्वनियोजनातून हा गोंधळ घातल्याचा आरोप शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी केला आहे.
वंदे मातरम म्हणण्यावरून राष्ट्रीय पातळीच्या राजकारणातही खडाजंगी होत असताना आज औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ उडाला.