प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पंचायत समितीमध्ये तोडफोड

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम सी राठोड यांना मारहाण केली.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 5, 2018, 07:20 PM IST
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पंचायत समितीमध्ये तोडफोड title=

औरंगाबाद : प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम सी राठोड यांना मारहाण केली.

कार्यालयाची तोडफोड

मारहाण करण्यासोबतच त्यांच्या कार्यालयाचीही तोडफोड करण्यात आली. प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते कार्यालयात माहिती विचारायला गेले होते. 

काय होतं कारण?

मात्र गटविकास अधिका-यांनी समाधानकारक उत्तर दिलं नसल्याचा राग येऊन, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.