पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट

पूजाशी ऑडिओ क्लीपमध्ये बोलणारा 'गबरू शेठ' कोण?

Updated: Feb 23, 2021, 09:57 PM IST
पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून आणखी एक धक्कादायक गौप्यस्फोट title=

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी आणखी नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे. पूजा चव्हाणच्या आयुष्यात एका व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग होता... कोण आहे ती व्यक्ती? आणि पूजाशी त्याचं नेमकं नातं काय होतं?

पूजा चव्हाणच्या लॅपटॉपमधून धक्कादायक गौप्यस्फोट

टिक टॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यू प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आली आहे. पूजाच्या मृत्यूनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पूजाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याचा तपास पुणे पोलीस करतायत... अशावेळी पूजाच्या लॅपटॉपमधील अनेक महत्त्वाचे व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि फोटो झी २४ तासच्या हाती लागले आहेत. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आता एका नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. त्याचं नाव आहे गबरू शेठ.

गबरूच्या नावाच्या केकचे फोटो या लॅपटॉपमध्ये सापडले आहेत. हा गबरू पूजाला आपल्या हातानं केक भरवतानाचा फोटोही त्यात आहे. त्यामुळं हा गबरू नेमका कोण, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याच लॅपटॉपमध्ये गबरू शेठ आणि पूजा चव्हाण यांच्यातल्या संभाषणाची नवी ऑडिओ क्लिप देखील आहे. या गबरू शेठसोबत पूजाचं नेमकं काय बोलणं झालं, तुम्हीच पाहा.

ऑडिओ क्लिपमधला हा आवाज नेमका कुणाचा, याचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. पूजाच्या आयुष्यात या गबरू शेठचं नेमकं काय स्थान होतं? पूजाच्या मृत्यूला हा गबरू शेठच जबाबदार आहे का? या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं पोलिसांना शोधावी लागणार आहेत.