अनैतिक संबंधातून मित्रावर कोयत्यानं वार

हात धडापासून केला वेगळा

Updated: Oct 8, 2018, 11:40 AM IST
अनैतिक संबंधातून मित्रावर कोयत्यानं वार title=

सिंधुदुर्ग : अनैतिक संबंधातून मित्रावर कोयत्यानं वार करून त्याचा हात धडापासून वेगळा केल्याप्रकरणी सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यात घडली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून पोलिसांना आरोपी गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक केली. मंगेश गवस असं आरोपीचं नाव आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या या प्रकारनंतर आरोपीनं वापरलेला कोयता अद्याप पोलिसांना सापडलेला नाही.

मणेरी तळेवाडी येथे मुंबईहून मानलेल्या बहिणीकडे आलेल्या युवकाचा हात त्या मानलेल्या बहिणीच्या नवऱ्यानेच तोडल्याचे उघड झाले. युवकाचे पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे पोलीस तपासात उघड झाले. दुपारी त्यांच्यात वाद झाला आणि यातूनच तरुणावर हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये त्याचा उजवा हात तुटला.