अमरावती : कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी कोविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या वॉर्डबॉयवर हल्ला करून रुग्णालयातही तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोविड रुग्णालयात घडला होता. या हल्ल्यात वॉर्डबॉय कुशल तायडे हा जखमी झाला आहे. नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ असंघटित कामगारांनी आज काम बंद आंदोलन करून तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला.
रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ असंघटित कामगारांनी आज काम बंद आंदोलन करून तीव्र शब्दात हल्ल्याचा निषेध केला. मारहाण झालेल्या वॉर्डबॉयच्या कुटुंबाला आर्थिक मदत, मारहाण करणाऱ्याना कठोर शिक्षा, रुग्णालयात काम करणाऱ्याना सुरक्षा आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहे.
आरोग्य विभागातील कर्मचारी मात्र जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णालयात सेवा देत आहे. असे असताना सुद्धा अनेक कोरोना योद्धावर जीवघेणा हल्ला झाल्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट या कोविड रुग्णालयात मंगळवारी रात्री घडली. एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक तेथे आल्यानंतर त्यांनी वॉर्डबॉयला मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. परंतु मृतदेह ताब्यात देण्याबाबत मला अधिकार नाहीत. त्यामुळे मी मृतदेह देणार नाही, असे सांगितल्यानंतर त्याला जोरदार मारहाण करण्यात आली.
संतप्त झालेल्या नातेवाईकांनी वार्डबायला जबर मारहाण केल्यानंतर रुग्णालयातील एका कार्यालयाची तोडफोडह करून संगणकाची नासधूस केली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असून सध्या या वॉर्डबॉयवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान या हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील नर्स आणि असंघटित कामगार संघटना या एकवटल्या असून त्यांनी या घटनेचा आज कामबंद आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.