Nashik Crime News : पुण्यात (Pune) कोयता गँगने (Koyata Gang) धुमाकूळ घातला असताना आता नाशिक (Nashik) शहरात अशाच प्रकारची दहशत पहायला मिलाली आहे. चक्क शाळेमध्ये कोयत्याने हल्ला करण्यात आला. दहावीचा पेपर सुटल्यावर शाळे बाहेरच ही घटना घडली आहे. एक एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शाळेचा आवारात हा प्रकार घडल्यामुळे मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे तर वळत नाहीत ना? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे (Nashik Crime News).
नाशिकमध्ये कोयत्या गँगची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. एका शाळकरी मुलावर कोयत्याने हल्ला झाला आहे. दहावीचा पेपर संपल्यानंतर एक विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. यावेळी आठ ते दहा जणांच्या टोळल्याने या मुलावर अचानक कोयत्याने वार केले असल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी केला.
कोयत्याच्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणकी दोन विद्यार्थी देखील या घटनेत जखमी झाले आहेत.
हल्ला करणाऱ्या टोळीतील मुलांशा जखमी विद्यार्थ्यांचा किरकोळ वाद झाला होता. याचा राग मनात धरुनच या विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच आहे. गुंडांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. घरफोडीच्या गुन्ह्यात जेलमधून जामीन मिळवून बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराने कोयते उगारून दहशत माजवली आहे. गुंडांनी रस्त्यावर लावलेल्या वाहनांची तोडफोड केली आहे. ही घटना येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण आहे. येरवडा पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय...मात्र, सलग तिस-या दिवशीही कोयता गँग धुडगूस घालत असल्याने यांना पोलिसांचा धाक नाही का ? असा सवाल स्थानिकांकडून विचारला जात आहे.