मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर

Assembly Election 2024:  मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Pravin Dabholkar | Updated: Aug 5, 2024, 12:25 PM IST
मोठी बातमी! विधानसभेसाठी मनसेकडून शिवडी आणि पंढरपूरचे उमेदवार जाहीर  title=
मनसेकडून उमेदवारांची घोषणा

Assembly Election 2024: विधानसभेसाठी मनसेकडून 2 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. पण विधानसभा निवडणुकीसाठी 225 ते 250 जागा लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती. विधानसभा निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर झाल्या नाहीत. सर्वच पक्षांनी जनतेमध्ये जाऊन पक्षाचा प्रचार करायला सुरुवात केली. पण कोणत्याही पक्षाने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केली नाहीय. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले होते. आता त्यांनी उमेदवारांच्या नावाचीदेखील घोषणा केली आहे. 

ब्लू प्रिंट बनवण्यापेक्षा ब्लू फिल्म बनवली असती तर तुम्ही पाहिली तरी असती! राज ठाकरेंची फटकेबाजी

 मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.शिवडीतून मनसेकडून बाळा नांदगावकर यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर  पंढरपूर विधानसभेतून दिलीप धोत्रे हे मनसेचे उमेदवार असतील. बाळा नांदगावर हे पक्षाच्या सुरुवातीपासून राज ठाकरे यांच्यासोबत आहेत. ते शिवडी विधानसभेचे माजी आमदारदेखील राहिले आहेत. शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करत बाळा नांदगावकर यांनी शिवडी विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवला होता. 

वरळीतून संदीप देशपांडे?

शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीय.. तर वरळी विधानसभेतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वरळीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे आमदार आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. यावेळी संदिप देशपांडेंना तिथून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे. संदीप देशपांडे यांच्या नावाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. वरळीसह दक्षिण मुंबईत मनसेने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मराठी बहुल भागात मराठी माणसांच्या नोकऱ्या, घरांचे प्रश्न मनसेकडून सातत्याने मांडण्यात येतात. दरम्यान आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या रणनीतीने मैदानात उतरते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही- राज ठाकरे 

या महाराष्ट्रात इतक्या गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत की तिथे आरक्षणाची गरजच नाही,असे विधान राज ठाकरेंनी केले. पुणे, नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वैगेरे सुविधा का होतात? मुळच्या लोकांसाठी नाही होत. बाहेरुन आलेल्या लोकांसाठी होतात. ठाणे हा जगातील एकमेव जिल्हा आहे जिथे 7 ते 8 महानगरपालिका आहेत. ही लोकसंख्या काय ठाण्यातील लोकांनी वाढवली? बाहेरुन येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही. यूपी बिहारला नोकऱ्यांच्या जाहिराती येतात पण महाराष्ट्रातील रोजगाराकडे लक्ष देण्यास सरकारला वेळ नाही. गेली अनेक वर्षे असेच सुरु आहे. आता बेरोजगारांची यादी येत नाही. महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. सर्वात आधी इथल्या मुलांना प्राधान्य द्या, असे राज ठाकरे सोलापूर दौऱ्यात म्हणाले. 

महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाहीय, इथे सर्व मुबलक; केवळ मतांच्या राजकारणासाठी...'- राज ठाकरे