आश्रमशाळेतल्या ७ वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या

ढाणकी इथल्या निवासी आदिवासी आश्रम शाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

Updated: Nov 13, 2017, 03:31 PM IST
आश्रमशाळेतल्या ७ वर्षाच्या विद्यार्थ्याची हत्या title=

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड तालुक्यातील ढाणकी इथल्या निवासी आदिवासी आश्रम शाळेतील ७ वर्षीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. 

प्रदीप संदीप शेळके असं मृत विद्यार्थ्यांचं नाव

प्रदीप संदीप शेळके असं मृत विद्यार्थ्यांचं नाव असून तो पहिलीतील विद्यार्थी आहे. शाळेबाहेरच्या दत्तोबा तलावाजवळ प्रदीपचा दगडाने ठेवलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. काल दुपारपासून तो शाळेतून बेपत्ता होता.  

भाजपच्या माजी आमदारांची निवासी आश्रम शाळा

भाजपचे माजी आमदार उत्तम शेळके यांची ही निवासी आदिवासी आश्रमशाळा आहे. ही निवासी आश्रमशाळा असल्यामुळं प्रदीप शाळेबाहेर कसा पडला? त्याच्या हत्या कुणी आणि कशासाठी केली? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.  

आश्रमशाळा व्यवस्थापनाविरोधात रोष

ग्रामस्थांनी आश्रमशाळा व्यवस्थापनाविरोधात रोष व्यक्त केलाय. दरम्यान पोलिसांनी प्रदीपचा मृतदेह न्यायवैद्यक चाचणीसाठी पाठवून पुढील तपास सुरू केला आहे.