आशिष शेलार यांनी बारामतीत घेतली पवारांची भेट

 मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 23, 2018, 03:41 PM IST
आशिष शेलार यांनी बारामतीत घेतली पवारांची भेट title=

मुंबई : राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची चर्चा सुरु असतानाच, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली आहे.

भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात

या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात राहिलंय. दुसरीकडे, या भेटीदरम्यान आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समवेत बारामतीतील विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल, शरद पवार वस्तू संग्रहालय यासह शारदानगर शैक्षणिक संकुल आणि कृषी विज्ञान केंद्राचीही पाहणी केली.

दरम्यान, या भेटीचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही भेट राजकीय कारणासाठी नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.