भूकेने व्याकुळ गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध

भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने दूध पाजले आहे.  

Updated: Jan 12, 2019, 04:55 PM IST
भूकेने व्याकुळ गाईच्या वासराला कुत्रीने पाजले दूध title=

पुणे : जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भूकेने व्याकुळ झालेल्या गाईच्या वासराला चक्क कुत्रीने दूध पाजले आहे. शिरुर येथील एका भटक्या गाईने प्लास्टीक गिळले होते. त्यामुळे ही गाई फुगल्याने जीवाच्या आकांताने ओरडत होती आणि एका ठिकाणी तडफडत पडली होती. तर याच गाईचे वासरू भूकेने व्याकुळ होवून ओरडत असताना चक्क या वासराला कुत्रीने दूध पाजल्याने शिरुर शहरातील नागरिकांना आश्चर्य वाटले. त्यामुळे मुक्या प्राण्यांमध्ये ही मातृत्वाची आई ममता म्हणजे काय असते याची आदर्श घटना पाहायला मिळाली आहे.

प्लास्टिकची शिकार झाली वासराची 'माता'

दरम्यान, राज्यात प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. मात्र, आजही राजरोस या बंदीचे उल्लंघन होताना दिसत आहे. बंदी घालल्यानंतर तात्काळ कारवाई करण्याचा दिखावा प्रशासन अधिकाऱ्यांनी दाखवला. मात्र, आता तसे काही होताना दिसत नाही. प्लास्टिक वापरामुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे. तसेच त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत. प्लास्टिक गिळल्यामुळे शिरुर येथे एका गायीची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे ती मदतीसाठी ओरड असल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच तिच्यावर तिचे अवलंबून असणारे पाडसंही भूकेळे व्याकुळ झाले. हे दृष्य बघणारेही हेलावून गेलेत. मात्र, घातक प्लास्टिकची बंदी कायमची कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

मातृत्वाच्या ममतेचे अनोख उदाहरण

मुक्या प्राण्यांमधील ही ममता पाहून अनेकांना नवल वाटले. याचा व्हिडिओ काहींनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातबद्ध केला. पाहा हा व्हिडिओ.