Anil Deshmukh News :आजी आणि माजी गृहमंत्र्यांच्या आरोप प्रत्यारोपात आता एन्ट्री झालीय समीत कदम यांची. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोप केलेले ते हेच समित कदम आहेत... मात्र समित कदम यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत...ठाकरे आणि अजितदादांवर खोटे आरोप करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. तर देशमुखांनी माझ्याकडून मदत मागितली होती...त्यासाठी भेटायला त्यांनी बोलावलं होतं असा दावा समित कदमांनी केलाय..या प्रकरणात आता संजय राऊतांनीही निशाणा साधलाय.
अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालेयत...अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचा नरेटिव्ह सेट केला जातोय...मात्र, अनिल देशमुख हे हेल्थच्या कारणामुळे बाहेर आलेले नाहीत...तर ठोस पुरावे नसल्याने जामीन मिळाल्याचा दावा सलील देशमुख यांनी केलाय...त्यांनी कोर्टाची ऑर्डरदेखील दाखवलीय...ऐकीव माहितीवर देशमुखांना अटक करण्यात आली...यावेळी तपास करताना माझ्या 6 वर्षांच्या मुलीचीही चौकशी केली...हे कुणाच्या सांगण्यावरून होत होतं हे योग्य वेळ आल्यावर सांगेन असा इशारा सलील देशमुख यांनी दिलाय...
राऊतांच्या आरोपांना मग भाजपनेही प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या चित्रा वाघ यांनी समित कदम आणि शरद पवारांचा फोटोच सोशल मीडियावर टाकला.. तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज असल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिलाय.
अनिल देशमुखांनी आणखीही मोठे आरोप करत खळबळ उडवून दिलीय. आदित्य ठाकरे आणि पार्थ पवार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मला प्रतिज्ञापत्रावर सह्या करण्यासाठी दबाव टाकण्यात आला असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय. अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालेयत... तपास करताना आपल्या 6 वर्षांच्या मुलीचीही चौकशी केली...असा आरोपही सलील देशमुखांनी केलाय. आजी आणि माजी गृहमंत्र्यांमधल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आणि आता समित कदम यांनी केलेल्या दाव्यांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.. तर निवडणुकीच्या तोंडावर फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा समित कदम यांनी केलाय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. शरद पवार, उद्धव ठाकरेंविरोधात ऍफिडेव्हिट करुन द्या तुम्हाला सोडतो, असा प्रस्ताव अनिल देशमुखांसमोर ठेवण्यात आला होता. त्याबाबतची माहिती अनिल देशमुखांनी प्रसारमाध्यमांना दिली. आता फडणवीसांनी दम असेल तर कारवाई करावी, असं आव्हान पटोलेंनी दिलंय.