अनिकेत कोथळे खून प्रकरण: पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु

सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणात अटकेत असलेला पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

Updated: Nov 15, 2017, 11:28 AM IST
अनिकेत कोथळे खून प्रकरण: पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु title=

  सांगली: सांगलीतील अनिकेत कोथळे खून प्रकरणात अटकेत असलेला पीएसआय युवराज कामटेचा तपास यंत्रणेला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

 आपण पळून जाऊ शकतो, दाखवू का ? अशी धमकी तो पोलिसांना देतोय. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. तसंच सीसीटीव्ही सोबतच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 
 
 दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ अधिका-यांवर कारवाई आणि सर्वपक्षीय कृती समितीची मागणी कायम आहे. तर जिल्हाधिका-यांनी शासनाला अहवावला सादर केल्यानंतर पीडित कुटुंबाला मदत करण्यात आली आहे.