सांगली : अनिकेत कोथळेच्या खुनाच्या निषेधार्थ सांगलीकरांनी बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वपक्षीय कृती समितीने ही बंदची हाक दिली आहे.
पोलिसांनी अनिकेत कोथळेच्या खून प्रकरणात गुन्ह्यात वापरलेली तीन वाहनं जप्त केली आहेत. सीआयडीनं ही जप्तीची कारवाई केली असून अनिकेतच्या शरीराचे अवयव डीएनएसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
एकीकडे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असली तरी कामटेला पाठिशी घालणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर अजून कारवाई का नाही झाली? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
तर मुख्य सूत्रधार आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याचे पोलीस कोठडीतही नखरे सुरूच असल्याचा आरोपही करण्यात येतोय. घरच्या जेवणाचा डबा देण्यासाठी कामटेकडून दमबाजी सुरू असल्याचं बोललं जातंय.