Amruta Fadnavis on Bhagat Singh Koshyari : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी कोश्यारींच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. अशातच उपमुख्यमंत्री आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया देत कोश्यारींची पाठराखण केल्याचं दिसत आहे. (Amruta Fadnavis on Bhagat Singh Koshyari Controversial Statement latest marathi News)
मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना व्यक्तिगत ओळखते. कोश्यारी हे एकमेक राज्यपाल आहेत जे मराठी शिकत आहेत. मराठी भाषेवर प्रेम करतात. मराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात. मात्र त्याचा वेगळा अर्थ काढला जातो याच्याआधीही अनेकवेळा असं झालं आहे. ते मनापासून मराठी आणि महाराष्ट्रीयन लोकांवर प्रेम करत असल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभर निषेध व्यक्त करण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शिवरायांची तुलना उपस्थित पाहुण्यांशी केली होती.
भगतसिंह कोश्यारी काय म्हणाले होते?
आम्ही लहानपणी शाळेमध्ये होतो तेव्हा आम्हाला शिक्षक विचारायचे तुमचा फेवरेट हिरो कोण? तेव्हा कोणी सुभाषचंद्र बोस, नेहरूजी किंवा गांधीजी यांची नावं घ्यायचे. परंतु तुम्हाला जर कोणी विचारलं तुमचा फवरेट कोण तर तुम्हाला महाराष्ट्राबाहेर जायची गरज नाही. कारण तुमचे हिरो इथेच मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातीस विषय, मी नव्या काळाबद्दल बोलत आहे. ते इथेच मिळतील. यामध्ये
म्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले होते.