भ्रष्ट्राचारामुळे काँग्रेसचा एकही मुख्यंमत्री ५ वर्षे टिकला नाही - अमित शाह

राहुल गांधी, शरद पवारांवर जोरदार टीका

Updated: Oct 11, 2019, 01:01 PM IST
भ्रष्ट्राचारामुळे काँग्रेसचा एकही मुख्यंमत्री ५ वर्षे टिकला नाही - अमित शाह title=
संग्रहित फोटो

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे आले होते. औसा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारासाठी शहा आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. 

भाजपने प्रचारात काश्मीर मधील अनुच्छेद ३७० हटविण्याचा लावून धरलेल्या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते टीका करीत असले तरी याचे शहा यांनी याचे जोरदार समर्थन केले. अनुच्छेद ३७० हटवणे म्हणजे राष्ट्रीय अस्मिता असून ती भाजप निवडणुकीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवून जोपासणार असल्याचेही स्पष्ट केले. 

हा निवडणुकीचाही मुद्दा असून यापासून शरद पवारच काय आम्हाला कोणीही रोखू शक्य नसल्याचे अमित शहा यांनी यावेळी स्पष्ट केले. विकासाच्या गप्पा करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने १५ वर्षे राज्यात भ्रष्टाचार केल्यामुळेच त्यांचा एकही मुख्यमंत्री पाचवर्षे पूर्ण करू शकला नाही. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी फक्त विकासाचे राजकारण केल्यामुळे त्यांच्यावर कसलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. 

परिणामी फडणवीस यांनी पाच वर्षे तर पूर्ण केलेच पण पुढील पाच वर्षेही ते पूर्ण करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान २०२४ पर्यंत देशात घुसखोरी केलेल्यांना 'चुन-चुन के हमारी सरकार निकलेगी' असे यावेळी अमित शहा यांनी जाहीर केले.