चक्क बैल बंडीतुन नगर परिषदेच्या गेटवर फेकला कचरा

दर्यापूर शहरामध्ये मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य

Updated: Sep 21, 2020, 08:19 PM IST
चक्क बैल बंडीतुन नगर परिषदेच्या गेटवर फेकला कचरा title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : गेल्या तीन महिन्यांपासून दर्यापूर शहरामध्ये मोठ्याप्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपालिका हद्दीमध्ये एकूण बारा वार्ड असून त्यामधून २० नगरसेवक निवडून आलेले आहेत. नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत व्हावे हे पंतप्रधानांचे स्वप्न असून त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येत आहे. 

मात्र दर्यापूर नगरपालिका प्रशासनाला कोट्यवधीचा निधी प्राप्त असून सुद्धा गेल्या तीन महिन्यापासून दर्यापूर शहरवासीयांना घाणीच्या साम्राज्यात मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. या घाणीमुळे साथीचे आजार झपाट्याने वाढत चालले आहे. नगरपालिका प्रशासनाला जाग यावी यासाठी जिजाई प्रतिष्ठान च्या वतीने चार दिवसापूर्वी संपूर्ण शहरातील कचरा उचलणे संदर्भात निवेदन देण्यात आले होते. 

तरीसुद्धा नगरपालिका प्रशासनाने झोपेचे सोंग घेऊन कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यामुळे आज जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जिजाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातून चक्क बैलबंडी मध्ये कचरा टाकून दर्यापूर नगरपालिके पर्यंत फेरी काढून नगरपालिका कार्यालयाच्या गेट समोर कचरा  टाकून दर्यापूर नगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

नगरपालिका प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिजाई प्रतिष्ठानचे पदाधिकाऱ्यांनी चर्चा झाल्यानंतर करून तातडीने संपूर्ण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा येथे तीन ते चार संपूर्ण कचरा उचलण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी यावेळी दर्यापूर पोलिस प्रशासना चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.