समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; कार दुभाजकाला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर गेले तीन दिवस सातत्याने मोठे अपघात होत आहे. शुक्रवारी विदर्भ ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातानंतर डिझेल टाकीचा स्फाेट होऊन बसने पेट घेतला. या स्फोटानंतर संपूर्ण बस प्रवाशांसह जळून खाक झाली.त्यानंतर आता पुन्हा एक अपघात झाला आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 2, 2023, 01:37 PM IST
समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; कार दुभाजकाला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू  title=

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) अपघाताची मालिका सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एक मोठा अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गाजवळील कोपरगावजवळ (Kopargaon झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोपरगावच्या धोत्रे गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या भीषण अपघातात आणखी तिघांचा बळी गेला आहे कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका महिलेसह दोघांचा जागीच मृत्यू झालाय. वेगात असलेली ह्युडांई व्हरेना गाडी दुभाजकावर आदळली आहे. या अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. नांदेडहून मुंबईकडे जात असतानाच हा भीषण अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

बीआरटी लेनला धडकून एसटी बसचा अपघात

पुणे नगर महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला असून बीआरटी लेन ला बनवण्यात आलेल्या डिव्हायडरला ही बस धडकल्याने हा अपघात झालाय. त्यामुळे बीआरटीची लेन हटवावी अशी मागणी आमदार अशोक पवार आणि आमदार सुनिल टिंगरे यांनी केली असून याबाबत आता प्रशासन आणि राज्य सरकार किती गांभीर्याने विचार करता हे पाहणं महत्त्वाचं आहे. बीआरटी लेनला धडकून यापूर्वी अनेक अपघात झाले असून बी आर टी लेनची आवश्यकता काय असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे वाहतूक कोंडी वाढत चालली असून बीआरटी लेन काढावी अशी मागणी आमदार अशोक पवार यांनी केली आहे.