मुंबई : Corona patient increase in Maharashtra : राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या रुग्णसंख्येबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर इशारा दिला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढली तर विचार करावा लागेल, असे अजिदादा म्हणाले. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला. काही नेते मास्क वापरत नव्हते तर दुसऱ्यांदा कोरोना झाला. आता अडचण झाली आहे. काही जन ऑपरेशन करायला गेले तर त्याचे ऑपरेशन झाले नाही. त्यामुळे प्रत्येकाची आरोग्य महत्वाचे असते हे लक्षात घ्या, अजित पवार म्हणाले.
राज्यात कोरोनाची चौथी लाट येतेय की काय अशी भीती आहे. कारण बुधवारी राज्यात 1081 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या हजारांपार गेलीय. मुंबईत काल 739 रुग्ण आढळलेत. राज्याची रुग्णसंख्या तीन दिवसांत दुप्पट झाली आगे. वाढत्या रुग्णसंख्येवर टास्कफोर्स लक्ष ठेऊन असून याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि मास्कचा वापर करावा असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांसह चर्चा करायला आम्ही तयार आहोत, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. कर्जमाफी दिली त्यावेळेच तक्रार होती. आता आम्ही कर्जमाफी दिली त्यातही तक्रारी आहेत. काही कागदपत्रात त्रुटी राहिल्या असतील तर ते अशा तक्रारी करतात असं अजित पवार म्हणाले.