हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकार - अजित पवार

आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे आणि  पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या. 

Updated: Apr 3, 2018, 08:14 PM IST
 हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकार - अजित पवार title=

कोल्हापूर : आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे आणि  पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या. 

सोडवण्यासारखे तुमचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू, जर तुमचे प्रश्न सोडवले नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी सभेत केले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरू आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपच्या युती टीका केली.  येत्या काही महिन्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी  येथील जाहीर सभेने झाली.  या सभेत अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये  शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरू आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली. 

पवार म्हणाले, देशात व राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजपने काय केले, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न उपस्थित केला तर समिती नेमतो, अभ्यास करतो हे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री यांचे उत्तर ठरलेले आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्यांची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला.