अलिबाग : रायगडमधील ( Raigad) महाड MIDCमध्ये वायुगळती झाल्याचीबाब पुढे आली आहे. (Air leak in Mahad MIDC) इंन्डो अमाईन्स कंपनीत वायुगळीची ही घटना घडली. यात दुर्घटनेत सात कर्मचारी बाधीत झाल्याचे पुढे आले आहे. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील इंडो अमाईन कारखान्यात वायुगळती झाल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. परिसरात अर्लट जारी करण्यात आला आहे. वायुगळतीने बाधित कामगारांवर महाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Maharashtra: Seven people fall ill from hydrogen sulphide gas poisoning at a plant in Raigad
The affected have been sent to hospital for treatment
Visuals from outside the plant pic.twitter.com/L8xK38fC66
— ANI (@ANI) January 22, 2021
गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास तेथे काम सुरू असताना हायड्रोजन सल्फाईडची गळती झाली. हे लक्षात येताच फायर अँड सेफ्टीची टीम बोलावण्यात आली आहे. गळती थांबवण्यात यश आले असले तरी कंपनीच्या परिसरात कुणाला प्रवेश दिला जात नाही. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.