अहमदनगर : नववर्षाचा जल्लोष करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भंडारदार धरणाच्या परीसरातही नविन वर्ष साजरं करण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं दाखल झाले आहेत.
पर्यटकांच्या सुविधेसाठी येथील आदिवासी महिला आणि तरूण टेंट, जेवण अशा सुविधा पुरवताहेत. पाटबंधारे विभागाच्या वतीनेही येथे येणा-या पर्यटकांच्या उत्साहात भर घालण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. तर अब्रेला फॉलही सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थंडीचा मोसम असला तरी या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केलीय. या परिसरात 300 च्या वर टेंट लावण्यात आले आहेत.
पाहा व्हिडिओ