औरंगाबाद : मुलाच्या पहिल्याच वाढदिवसाच्या दिवशी वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याचा क्रूर खेळ नियती जाधव कुटुंबीयांसोबत खेळतेय.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील केळ गावातील सुपुत्र जवान संदीप जाधव जम्मू कश्मीर मधे शहीद झाले. संदीप यांना आज अखेरची सलामी देण्यात येईल. शहीद संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात केळगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमूह लोटला होता. भावपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
जाधव यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. संदीप जाधव २००२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी सैन्यात भरती झाले होते. जाधव पंधरा वर्षाच्या सेवेनंतर पुढच्या दीड वर्षात सेवानिवृत्त होणार होते.
खरंतरं जाधव यांचा धाकटा मुलगा शिवेंद्रचा आज पहिला वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसाची घरी तयारी सुरु होती. पण जाधवांच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
शहीद जाधवांचं पार्थिव आज गावात येणार आहे. त्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. शत्रूशी दोन हात करताना वीरमरण आलेले संदीप जाधव हे तिसरे या गावातील जवान आहेत. यापूर्वी २००३ मध्ये माधवराव गव्हांडे, २०१० मध्ये काळूबा बनकर यांनाही वीर मरण आलंय.
खरंतरं संदीप जाधव यांच्या निधनाची बातमी त्यांच्या वडिलांना रात्री टीव्हीवर समजली होती. पण कुटुंबाला बसणारा धक्का लक्षात घेऊन त्यांनी शुक्रवारी सकाळपर्यंत ती मनातच दडवून ठेवली होती.