⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ

पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा प्रताप समोर आला आहे. या महिला अधिकाऱ्याने अनेक महिलांची फसवणुक केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Jul 27, 2024, 06:25 PM IST
⁠रेणुका ईश्वर करनुरे... पूजा खेडकरनंतर  पुण्यात आणखी एका बनावट आयएएस अधिकारीचा धुमाकूळ title=

Pune Fake IAS Officer :  वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण सध्या राजङर चांगलेच गाजत आहे.  पूजा खेडकर यांच्या कारनाम्यानंतर आता पुण्यात आणखीन एक बनावट आयएएस अधिकारी धुमाकूळ घालत आहे.  ⁠रेणुका ईश्वर करनुरे असे बनावट आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. 

⁠पुण्यातील वडकी परिसरात राहणाऱ्या रेणुका ईश्वर करनुरे या महिला आयएएस अधिकारीने परिसरातील अनेक महिलांना व्याजाने पैसे दिले. रेणुका दरमहा दहा रुपये टक्क्याने  पैसे उकळत आहे.  ⁠या प्रकरणी रेणुका विरोधात एका 31 वर्षे महिलेने लोणी काळभोर पोलिसात अवैध सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे. ⁠31 वर्षे पीडित महिलेला बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने दोन लाख 68 हजार रुपये व्याजाने दिले होते.  ⁠या बदल्यात पीडित ने रेणुका यांना आतापर्यंत तीन लाख 48 हजार रुपये पर्यंत दिले असताना सुद्धा बनावट आयएस अधिकारी रेणुका हिने आणखीन चार लाख 55 हजार रुपयाची मागणी करत  त्रास देत धमकावत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केले आहे. 

मी आय एस अधिकारी आहे माझ्या नादीला लागू नको तुला कामाला लावेल, माझे पैसे तू ताबडतोब दे म्हणत धमकवण्यास सुरुवात केली असल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. ⁠या सगळ्या त्रासानंतर पीडित महिलेने लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ⁠या प्रकरणी आता बनावटा आयएस अधिकारी रेणुका ईश्वर करनुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेणुका हिच्या अनेक भानगडी आता समोर येणार आहेत. 

वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता

वादग्रस्त आयएएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यताय...पिंपरीतील थर्मोव्हेरीटा कंपनीने 2 लाख 72 हजारांचा कर अद्यापही भरला नाहीये...आधीच जप्तीची कारवाई केलेल्या या कंपनीचा लिलाव होऊ शकतो, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिलीय...याच कंपनीचा पत्ता पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वायसीएम रुग्णालयाला रेशनकार्ड मार्फत दिला होता...त्यामुळे आता या कंपनीवर लिलावाची कारवाई होण्याची शक्यताय...यामुळे खेडकरांच्या अडचणीत वाढ होणाराय.