Kalyan Crime News : कल्याणमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. भर रस्त्यात महिलांनी फ्री स्टाईल हाणामारी केली. जवळपास 20 मिनिट महिलांचा हा राडा सुरु होता. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांच्या समोरच हा सर्व प्रकार सुरु होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे(viral video ). या हाणामारीमुळे रस्त्यात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अखेरीस पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महिलांचा वाद मिटला. यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु झाली.
बाईकची धडक झाल्यावरुन झाला वाद
कल्याणच्या पत्रीपुला जवळ हा हाणामारीचा प्रकार घडला. दोन बाईक स्वारांची एकमेकांना धडक होऊन अपघात किरकोळ अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहन चालकांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरु झाली.
भर रस्त्याच्या मधोमध एकामेकांना मारहाण सुरू होती. तब्बल 20 मिनिटं ही हाणामारी सुरू होती. अनेकांनी या हाणामारीचे मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या व्हिडिओमध्ये पुरुष आणि महिला एकमेकांना तुफान हाणामारी करताना दिसत आहेत. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अहमदनगरच्या अकोळनेर गावात शेतात जाणाऱ्या रस्त्यावर शेततळे बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या भांडणांमध्ये लोखंडी रॉड, लाकडी दांड्यांचा वापर करण्यात आला. यामध्ये एकाला लोखंडी रॉडचा मार लागल्याने तो बेशुद्ध झालाय. त्याच्यावर नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहे. सहा जखमींवर जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले.
कोल्हापूरच्या शिवाजी स्टेडियमवर फुटबॉल मॅचऐवजी चक्क खेळाडूंमध्येच कुस्ती रंगली. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनकडून फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. मात्र, स्पर्धेदरम्यान दोन टीम्स आपापसात भिडल्या. वेताळमाळ आणि हनुमान तालीम मंडळाच्या खेळाडूंमध्ये वाद सुरु झाला. मात्र त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी मैदानातच एकमेकांवर खुर्च्या भिरकावल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच निवासस्थान असलेल्या नितीन सिग्नल लुईस वाडी परिसरात संध्याकाळ च्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि त्यालगतचा सर्व्हिस रोड वरही मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या वाहतूक कोंडीचे कारण समजू शकले नसून ईस्टर्न एक्सप्रेस वे वरील मुंबईहून ठाण्याच्या दिशेकडील येणाऱ्या मार्गवर तीन हात नाका ते नितीन जंक्शन पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळेच सर्व्हिस रोड वरून बरेच वाहनचालक आपली वाहने नेत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्था बाहेर लुईस वाडी परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.