गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी(Asia largest slum) अशी धारावीची(Dharavi ) ओळख आहे. मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकास रखडला आहे. शिंदे-फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis government) अस्तित्वात येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला(dharavi redevelopment plan) गती मिळाली आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. देसातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेला अदानी ग्रुप(Adani Group ) धारावीचा पुनर्विकास करणार आहे. कंत्राट दाराच्या शर्यतीत अदानी ग्रुप आघाडीवर आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी समूह इच्छुक आहे. अदानी समुहासह नमन ग्रुप आणि डीएलएफ कंपनी या तिघा बड्या विकासकांनी धारावीच्या पुनर्विकास निविदा प्रक्रियेत भाग घेतल्याची माहिती एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन यांनी दिलीय.
धारावी पुनर्विकास प्रकल्प हा तब्बल 23 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. 600 एकरावर पसरलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं कंत्राट कुणाला मिळणार, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागल आहे.