मुंबई - अहमदाबाद महामार्गावर दोन कार - बाईक अपघातात ५ ठार

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर  दोन कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. 

Updated: May 10, 2019, 06:58 PM IST
मुंबई - अहमदाबाद महामार्गावर दोन कार - बाईक अपघातात ५ ठार title=

पालघर : मुंबई - अहमदाबाद महामार्गावर आंबोली येथील पेट्रोल पंपासमोर भीषण दोन कार आणि एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. 

मुंबई मार्गावरुन जाणाऱ्या कारने बाईकस्वराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराद होती की, बाईक डिव्हायडर चढून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेली. त्याचवेळी एका कारला तिची धडक बसली. या विचित्र अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांची प्रकृती चिंताजणक आहे. दरम्यान, जखमींवर कासा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.