मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, १० जणांचा जागीच मृत्यू

मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्रही सुरू झाले आहे. . 

Updated: Jun 7, 2018, 09:35 AM IST

चांदवड : मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर अपघाताचे सत्रही सुरू झाले आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील सोग्रसजवळ वाळूची गाडी व मिनी ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात झाला आहे. 

भीषण अपघात 

 मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या अपघातात मिनी ट्रॅव्हल्समधील १० जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये काही लोक जखमी आहेत. जखमींना  चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जात आहे. मिनी ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशी कल्याण येथील असल्याचे समजत असून ते मध्यप्रदेश राज्यातील उज्जैनला जाऊन परत कल्याणकडे जात असल्याची माहिती एका जखमी प्रवाशानं दिलीय.