Ahmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला.  

Updated: Mar 24, 2023, 01:07 PM IST
Ahmednagar Accident : ट्रक - टेम्पो अपघातात 4 ठार, तर तीन जणांची प्रकृती गंभीर  title=

Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री कंटेनर पिकप आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. अहमदनगरच्या कामरगावमध्ये हा अपघात झाला. तीन जणांची प्रकृती अद्यापही गंभीर आणि चिंताजनक आहे. सर्व मृत हे शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला. अहमदाबाद गावावरती शोककळा पसरली आहे.

 कामरगाव शिवारातील ट्रक आणि टेम्पोच्या भीषण अपघातात 11 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू  यामध्ये एका 14 वर्षीय बालकाचा समावेश. देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झाला.

या अपघातात राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून जखमींवर उपचार सुरु आहेत. यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.