राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार; 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्याने खालसा केली

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार अभिजीत पाटील हे ठरले आहेत. माढामध्ये अजित पवार यांनी पॉवर गेम खेळत अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली. 

वनिता कांबळे | Updated: Nov 23, 2024, 02:46 PM IST
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला विजयी आमदार; 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्याने खालसा केली title=

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 :  राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा महाराष्ट्रातील पहिला आमदार विजयी झाला आहे. अभिजीत पाटील याच्या रुपाने शरद पवार गटाच्या आमदाराचा राज्यातील पहिला विजय मिळाला आहे. माढ्यात आमदार बबनराव शिंदे च्या  ३० वर्षाच्या सत्तेला  अभिजीत पाटील यांनी सुरुंग लावला  आहे. 30 वर्षाची सत्ता 30 हजार मताधिक्य घेऊन  अभिजीत पाटलांनी  सत्ता  केली खालसा केली.

 हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार विजयी; कोट्यावधीच्या मालमत्तेमुळे चर्चेत आलेला मुंबईतील हायव्होल्टेज मतदार संघ

शरद पवार गटाचे  उमेदवार अभिजीत पाटील माढ्यातुन 30 हजार 200 मतांनी  विजयी जाले आहे. आमदार बबनराव शिंदेचे पुत्र अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे सह महायुतीच्या उमेदवार मिनलताई  साठेचा दारुण पराभव केला आहे. 
माढा विधानसभा मतदारसंघात नावं सारखी असणारे उमेदवार, मतदारांचा चांगलाच गोंधळ उडला होता. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभिजीत पाटील आणि अपक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यात माढामध्ये मुख्य लढत झाली. मात्र, या मतदारसंघात 4 उमेदवार अभिजीत पाटील याच नावाचे होते. तर, रणजितसिंह शिंदे नावाचे 2 उमेदवारही रिंगणात होते. 

माढा विधानसभा मतदारसंघात अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची तुतारी हातात घेतलीय. माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार कोण याबाबत उत्सुकता होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेण्यासाठी इच्छुकांची भलीमोठी रांग होती. मोहिते पाटील यांच्या पसंतीचा उमेदवार रिंगणात उतरवायचा अशी रणनिती होती. शरद पवारांनी मोहिते पाटलांसमोर बबनदादा शिंदेंचे सुपूत्र रणजितसिंह शिंदे आणि अभिजीत पाटील असे पर्याय ठेवले. या दोन पर्यायांपैकी अभिजीत पाटील यांच्या नावावर मोहिते पाटलांनी पसंतीची मोहेर उमटवली.