Dombivali Crime News : आयुष्यात प्रत्येक जण यशस्वी होण्यासाठी धडपडत असत. मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते. फक्त कष्ट घेण्याची तयारी असली पाहिजे. मात्र, बरेच जण यश मिळवण्यासाठी शॉर्टकट शोधतात. या शॉर्टकटच्या नादात एका तरुणाला जेलमध्ये जावे लागले आहे. एका चुकीमुळे सगळ्या बिजनेसची वाट लागली आहे. अशाच एका तरुणाला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे. दूधाचा व्यावसाय करणाऱ्या या तरुणाने दुध टाकण्यासाठी बाईक चोरी केली होती.
डोंबिवली रामनगर पोलिसांनी एका दुचाकी चोराला बेड्या ठोकल्या आहेत. गणेश म्हाडसे असे या चोरट्याचे नाव आहे. पोलीस तपासात त्याने दुचाकी का चोरी केली याचे धक्कादायक कारण समोर आले. गणेश याने मुरबाड येथे दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. दूध टाकण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला दुचाकी विकत घेता येत नव्हती. अखेर त्याने दुचाकी चोरी करण्यासाठी निर्णय घेतला. गणेश याने बाईक चोरी करण्यासाठी डोंबिवली गाठली. डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी परिसरातून दुचाकी चोरली. डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरीला गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु केला व गणेशचा भांडाफोड झाला.
डोंबिवली रामनगर परिसरात काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी तत्काळ दुचाकी चोरट्याचा शोध सुरू केला. डोंबिवली पूर्व सारस्वत कोंडी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाचे आधारे डोंबिवली रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या गणेश म्हाडसे याला अटक केली. त्याच्या जवळून चोरी केलेली दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली.
गणेश मुरबाड खापरी गावातील राहणारा आहे. गणेश याने दुधाचा व्यवसाय सुरु केला होता. दूध ग्राहकापर्यंत पोहचवण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती. मात्र, आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यामुळे दुचाकी चोरी करण्याचा निर्णय घेतला.डोंबिवली गाठत डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी परिसरातून दुचाकी चोरी केली आणि मुरबाडला घेऊन गेलो असे त्याने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितले.
डोंबिवलीमध्ये कारागृहातून सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा चोरी केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला शोधून पुन्हा त्याची रवानगी कोठडीत केली. या चोरट्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. त्याच्यावर 3-4 गुन्हे दाखल आहेत. -सूरज ऊर्फ गोल्टी पटिया असे या आरोपीचे नाव आहे.