महिलांसाठी महत्त्वाची बातमी; मॉर्निंग वॉकला जात असाल तर सावधान...

Dombivali News: सध्या सगळीकडेच चोरीचं प्रमाण वाढू लागलं आहे. आपल्याला सध्या या सगळ्यामुळे अधिक सतर्क राहणे आवश्यक झाले आहे.

Updated: Nov 29, 2022, 04:36 PM IST
महिलांसाठी महत्त्वाची बातमी; मॉर्निंग वॉकला जात असाल तर सावधान...  title=

अतीश भोईर, झी मीडिया, डोबिंवली: सध्या सगळीकडेच चोरीचं प्रमाण वाढू लागलं आहे. आपल्याला सध्या या सगळ्यामुळे अधिक सतर्क राहणे आवश्यक झाले आहे. विशेषत: महिलांनी (women news) अशावेळी सतर्क राहणे अधिक आवश्यक झाले आहे. तुम्हाला माहितीच आहे की, मंगळसूत्र चोरी करण्याचे प्रमाण सध्या (robbery) सगळीकडे वाढू लागले आहे. त्यामुळे सध्या अशा अनेक घटना आपल्याला समोर येताना दिसत आहेत. सध्या असाच एक प्रकार डोंबिवलीत (dombivali crime news) पाहायला मिळाला या प्रकारामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (a thief grabs womans manglasutra in dombivali marathi crime news)

कसा घडला नेमका प्रकार: 

चोरट्याने एकटी असल्याचा फायदा घेत तिचा पाठलाग करून वृद्ध महिलेचा गळा दाबून मंगळसूत्र (manglasutra) लंपास केल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली होती या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या चोरट्याला अटक केली आहे.काणू वघारि असे या चोरट्याचे (theif) नाव असून काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीचे ऑपरेशन झाल्याने त्याच्या जवळील सगळे पैसे खर्च झाले होते या आर्थिक विवंचनेतून त्याने ही चोरी केल्याचं समोर आले.त्याने याआधी चोरी केल्या आहेत का? याबाबत पुढील तपास करत आहें.

हेही वाचा - सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड यांचा मोठेपणा; सुनावणी दरम्यान मराठीतून साधला संवाद

चोरी करण्याचे हजार फंडे: 

कुरार इथल्या एका दुकानात दुपारच्या वेळी दोन इसम गेले.  त्यांनी त्या दुकानादाराशी गप्पा मारायला सुरूवात केली आणि त्यांना सांगितले की ते मजूरीचं काम करतात आणि अशाप्रकारे एकदा खोदकाम करताना त्यांना सोनं सापडलं आहे आणि ते त्यांना विकायचं आहे. हे गुप्तधन आहे असा दावा त्यांनी केला होता. तेव्हा त्यांनी विचारले की त्यांना हे सोनं खरं आहे की नाही याची तपासणी करायची होती तेव्हा ही तपासणी (investigation) केली असता समोर आलेल्या माहितीनूसार त्यांना मिळालेलं सोनं खरं असल्याची खात्री पटली. तेव्हा गुन्हेगारांनी सांगितले की हे 10 लाखांचे गुप्तधन आम्ही तुम्हाला 5 लाखांना विकू. 

मग या दुकानदारानं आपल्या मित्रांकडून आणि काही पैसे गोळा केले आणि त्यातून त्यानं 4 लाख 60 हजाराची रक्कम गोळा केली आणि अशाप्रकारे तो दुकानदार त्यांच्याकडे पैसे घेण्यासाठी गेला आणि त्याच्याकडून त्या गुन्हेगारांनी पैसे उकळले आणि त्याला ते सोनं (gold) दिले परंतु हे खोटे सोने होते याचा त्या बिचाऱ्याला पत्ताच नव्हता. शेवटी ते सोनं खोटं असल्याचं तपासणीत उघड झाले. तेव्हा त्या दुकानदाराला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आलं आणि त्यानं त्या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.