7 वर्षाच्या मुलाला 40 टाके; नायलॉन मांजाने गळा कापला

नायलॉनच्या मांजाने गळा कापल्याने सात वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला 40 टाके पडले आहेत. नाशिकच्या येवला तालुक्यात ही घटना घडली आहे. 

Updated: Jan 1, 2024, 06:20 PM IST
7 वर्षाच्या मुलाला 40 टाके;   नायलॉन मांजाने गळा कापला title=

Nashik News : नायलॉन माजांवर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक ठिकाणी सर्रासपण नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. हाच नायलॉन मांजा अनेकांसाठी धोकादायक ठरत आहे. नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे 7 वर्षाच्या मुलाला 40 टाके पडले आहेत. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

येवला तालुक्यात व शहरात नायलॉन मांजाचा वापर सर्रास सुरू असल्यामुळे कटलेला पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने एका सात वर्ष चिमुरड्याला तब्बल 40 टाके पडले आहेत .मल्हार नितीन राऊत असे या सात वर्षाच्या मुलाचे नाव आहे. मल्हार आपल्या आजोबा सोबत अंकही चांदगाव या रस्त्याने येत असताना कटलेल्या पतंगीचा माझ्या मोटरसायकल वर अडकून त्याच्या गळ्यात अडकला. यात गंभीर दुखापत झाल्याने१ मल्हारच्या मानेपासून गालापर्यंत तब्बल 40 टाके पडले आहेत. जखम अतिशय खोलवर गेल्याने मल्हारचा जीव देखील जावू शकला असता मात्र वेळीच मल्हारला रुग्णालयात दाखल केल्या गेल्याने त्याचा जीव वाचला आहे .मात्र परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर आता उपचार सुरू असल्याची माहिती चंडालिया हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल चंडालिया यांनी दिली आहे.

नायलॉन मांजाने गळा कापल्याने पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्यातले पोलीस शिपाई समीर सुरेश जाधव, यांचा मांजाना गळा चिरला गेल्यानं मृत्यू झाला. ते अवघे 37 वर्षांचे होते. दिवसाची सेवा पूर्ण करुन ते दुपारी वरळीतल्या घरी दुचाकीवरुन जात असताना, सांताक्रुजमध्ये ही दुर्घटना घडली. त्यांना तातडीनं सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

नायलॉन मांजाच्या निर्मितीसह त्याच्या विक्री आणि खरेदीवरवरही गुन्हे दाखल करण्यात येणारेत. आगामी मकर संक्रांत सणानिमित्त नाशिक शहर पोलिसांनी नायलॉन मांजावर बंदी घातलीय. या बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कलम 188 नुसार गुन्हे दाखल केले जाणारेत. तसंच ज्यांच्यावर याअगोदर मांजाचे गुन्हे दाखल असतील त्यांना नाशिकमधून तडीपार, हद्दपारही केलं जाणारेय. 

यवतमाळ पोलिसांनी 6 लाखांचा प्रतिबंधित नॉयलॉन मांजा जप्त केला होता. मकर संक्रांतीनिमित्त मोठ्या प्रमाणात जिवघेण्या नॉयलॉन मांजाची विक्री सुरू असून, पोलिसांनी कारवाईसाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत यवतमाळच्या गुन्हे शाखेनं बंटी सिवोटीयाच्या दुकानात धाड टाकुन नायलॉन मांजा जप्त केला. 

नायलॉन मांजाची विक्री करणा-या एका तरुणाला पुण्यातील सहकारनगर पोलिसांनी अटक केली होती. धनकवडी परिसरात एका हॉटेलजवळ  ही कारवाई करण्यात आली. वेदांत राकेश गाढवे असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातलीय. तरीही शहरात नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याने ही कारवाई करण्यात आली.