रिक्षा निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर अंगावर बसून...; पुण्यातील धक्कादायक घटना

Crime News: पुण्यात (Pune) रिक्षा चालकाकडून (Rickshaw Driver) एका महिला प्रवाशावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने आधी महिलेला निर्जनस्थळी नेलं आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 21, 2023, 03:26 PM IST
रिक्षा निर्जनस्थळी नेऊन तरुणीचे कपडे काढण्याचा प्रयत्न, विरोध केल्यावर अंगावर बसून...; पुण्यातील धक्कादायक घटना

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे

 

rime News: पुण्यात (Pune) रिक्षा चालकाकडून (Rickshaw Driver) एका महिला प्रवाशावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षा चालकाने आधी महिलेला निर्जनस्थळी नेलं आणि नंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. वानवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हदीतून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका तरुणीवर रिक्षा चालकानेच बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 20 जून रोजी काळेपडळ येथील रेल्वे गेटच्या जवळ हा प्रकार घडला. 29 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे. अनिकेत रिशू कुमार (वय 24, शिवचैतन्यनगर, फुरसुंगी) असं या आरोपी रिक्षाचालकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

तरुणी पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. तरुणी 20 जून रोजी काम संपवून घरी निघाली होती. यावेळी ती आरोपी रिक्षा चालकाच्या रिक्षात बसली होती. पण आरोपीने यावेळी नेहमीच्या रस्त्याने न जाता दुसरा रस्ता घेतला. रिक्षाचालक तरुणीला घेऊन वर्दळ नसणाऱ्या रस्त्याने नेत एका अंधाऱ्या ठिकाणी गेला. यानंतर त्याने रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवली आणि तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हाताने तरुणीचं तोंड दाबून तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला. 

तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने तरुणीच्या अंगावर बसून अश्लील चाळे केले. यानंतर तरुणीने रिक्षातून पळ काढत पोलीस स्टेशन गाठलं. तरुणीने वानवडी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वानवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x