मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) हे वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी नेहमीच चर्चेत असतात. काल औरंगाबाद येथील विद्यापीठातील कार्यक्रमात त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान कारक बोलल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात संतापची लाट उसळली आहे. अशातच पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे धोतर फाडणाऱ्या वर १ लाखांचे बक्षीस ठेवले आहे. उचलत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपालाचा जाहीर निषेध करत त्यांनी त्या बॅनरवर संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीचे धोतर फाडणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख रक्कम बक्षीस देण्यात येईल असे राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्यांनी घोषित केलेलं आहे.
पुण्यातील वेगवेगळ्या मुख्य पाच चौकामध्ये असे बॅनर लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हे बक्षीस जाहीर केलेलं आहे त्यामुळे राज्यपालाच्या वक्तव्यावरचा वाद आता चांगला चिघळताना दिसत आहे. (a reward from ncp for those who tore governor bhagat singh koshyari dhoti a banner was put up in Pune nz)
औरंगाबाद मध्ये राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहेत. आता नवे आदर्श नितीन गडकरी हे तुमच्यासमोर बसले आहेत असे विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्या विरोधात आता संभाजी ब्रिगेड अनेक संघटना आक्रमक झाल्या असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून सुद्धा बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे.
संभाजीनगर मध्ये मराठा संघटनाने राज्यपाल कोश्यारी यांच्या विधाना विरोधात आक्रमक आंदोलन केलं यावेळेस आंदोलकांनी क्रांती चौकात रस्ता अडवण्याचाही प्रयत्न केला. आंदोलकांची आणि पोलिसांची धक्काबुक्की झाली या आंदोलनामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ही सहभागी झाले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या विधानाविरोधात पुण्यात युवक काँग्रेसच्या वतीने लाल महालाबाहेर आंदोलन करण्यात आलं. लाल महाल जवळ काँग्रेस पक्षाकडून कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कोश्यारी यांचा फ्लेक्स जाळला. यावेळी पोलिसांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपालांचं धोतर फाडण्यात येईल असा इशारा चिटणीस रोहन सुरवसे
यांनी दिला आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी वेळोवेळी राज्यपाल करत आहेत त्यांच्या विरोधात भाजप आंदोलन का करत नाही असा प्रश्न रोहन सुरवसे यांनी उपस्थित केलाय. घोषणाबाजी करत राज्यपालाचा निषेध नोंदवला.