Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत

Sanjay Raut On Chatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या अपमानावरुन  शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) 

Updated: Nov 20, 2022, 01:07 PM IST
Sanjay Raut : महाविकास आघाडीसोबत गेलो तेव्हा मुख्यमंत्र्यांचा स्वाभिमान दुखावला, आता कुठे गेला? - राऊत title=
छाया सौजन्य - एएनआय

Sanjay Raut On Eknath Shinde : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देताना शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जोरदार टोला लगावला आहे.(Maharashtra  Political News) महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी चार वेळा अपमान केला. महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्वाभिमान दुखावला गेला. आता तर भाजपने आणि त्यांच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. तरीही ते सत्तेला चिटकून बसले आहेत. आता तुमचा कोठे स्वाभिमान गेला, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे म्हटले. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा निषेध करुन  त्यांच्यासह 40 आमदारांनी राजीनामा द्यावा. एवढ्यावरच न राहता राज्य सरकारकडून राज्यपालांना हटविण्याची अधिकृत मागणी यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात, आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी सरकारला दिला.  (अधिक वाचा - Maharashtra Political News Live : राज्यपालांचं विधान, राजकीय घमासान)

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. तरीही मुख्यमंत्री शिंदे सत्तेला चिटकून बसले आहेत. स्वाभिमानाचे तुनतुनं वाजवत शिवसेना सोडलेल्या मुख्यमंत्र्यांचा आता कोठे गेला स्वाभिमान? असा सवाल  राऊत यांनी केला. अफजलखान आणि औरंगजेबाच्या कबरी तोडण्याची नाटकं कशाकरिता करता. स्वाभिमान सांगत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शिवसेना सोडली. आता तुमचा स्वाभिमान कोठे गेला? राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान करुन 72 तास झाले, तरी मुख्यमंत्री आणि त्यांचे आमदार निषेध करु शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरता का, असा सवाल राऊत यांनी केला.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राज्यपाल कोश्यारी यांनी शनिवारी नव्या युगाच्या आदर्शांवर भाष्य केले. ते म्हणाले,  छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुन्या जमान्याचे आदर्श आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नव्या युगातील आदर्श आहेत. राज्यपालांच्या या वक्तव्यावर सर्वत्र टीकेची झोड उठली आहे. खासदार संजय राऊत यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.  

शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकारमधून राजीनामा द्यायला पाहिजे होता. कारण हा भाजपने केलेला अपमान आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या आमदारांनी ताबडतोब राजीनामा द्यायला पाहिजे. महाविकास आघाडी सोबत गेल्यानंतर त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. इथे तर भाजपने आणि त्यांच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. तरीही हे सत्तेला चिटकून बसले आहेत. महाराष्ट्र तुमच्या सरकारवर थुंकतोय, अशा शब्दात राऊत यांनी समाचार घेतला.