मुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्या आता पाणी शिरले

 अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका होता की 7 मजली उंच इमारती इतके कारंजे उडाले. 

Updated: Aug 24, 2023, 02:48 PM IST
मुंबईत अंधेरी येथे पाईप लाईन फुटली; गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्या आता पाणी शिरले  title=

Water pipeline bursts in Andheri : मुंबईच्या अनेक परिसरात पाणी कपात असतानाच पश्चिम मुंबईत पाईप लाईन फुटली आहे. अंधेरी येथील लोखंडवाला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. पाण्याचा दाब इतका होता की 7 मजली उंच इमारती इतके कारंजे उडत होते. पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं परिसरात पाणीच पाणी झाले. 

बुधवारी दुपारी 3 च्या सुमारास  अंधेरी लोखंडवाला येथील जलवाहिनी फुटली. पाण्यावर एवढा दाब होता की इमारती एवढे उंच कारंजे उडत होते. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.  

गच्चीवरुन पाणी इमारतीत घुसले

पाईपलाईन फुटल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये सात मजली इमारती इतके उंच पाण्याचे फवारे उडत आहेत. पाणी फुल फोर्सने प्रावाहित झाले आहे. गच्चीवरुन 7 मजली उंच इमारतीच्य आता पाणी शिरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अगदी दुरुनही हा पाण्याचा उंच फवारा दिसत होता.  

अंधेरीत पाणी पुरवठा होणार नाही

पश्चिम विभाग हद्दीमध्ये, अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर ही 1200 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन आहे.  के पश्चिम विभाग हद्दीमध्ये, अंधेरी (पश्चिम) येथील आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी 23 ऑगस्टला दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर त्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले.  महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी, विभाग कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या जलवाहिनीतून होणारा पुरवठा बंद करुन पाणी गळती थांबवण्यात आली. तसेच जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम देखील तातडीने सुरु करण्यात आले आहे. या पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत मिल्लत नगर, एसव्हीपी नगर म्हाडा आणि लोखंडवाला परिसरात  पाणीपुरवठा होवू शकणार नाही असे मुंबई महापालिकेकडून सूचित करण्यात आले आहे. नागरिकांच्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका प्रशासन दिलगीर व्यक्त केली आहे.

24 ऑगस्टला मुंबईच्या काही भागात पाणीपुरवठा बंद

मुंबईच्या काही भागात गुरूवारी 24 तासांसाठी पाणीपुरवठा होणार नाही. चेंबूर, गोवंडी, देवनारमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद असेल. 24 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून 25 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई महापालिकेच्या ट्रॉम्बे जलाशयात दुरूस्तीची कामं सुरू असल्यानं 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळं नागरिकांनी पाणी जपून वापरावं, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केले आहे.