AI Crime : आर्टीफिशल इंटेलिजन्सने केलेला राज्यातील पहिला गुन्हा; विरारमध्ये खळबळ

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेला राज्यात पहिला गुन्हा घडला आहे. विरार मध्ये हा गुन्हा घडला आहे. 

Updated: Aug 23, 2023, 08:55 PM IST
AI Crime : आर्टीफिशल इंटेलिजन्सने केलेला राज्यातील पहिला गुन्हा; विरारमध्ये खळबळ   title=

Virar AI Crime :  AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अनेक क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने फसवणूक केली जात आहे. आर्टीफिशल इंटेलिजन्सने केलेला राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. विरारमध्ये आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने तरुणींचे अश्लिल फोटो तयार करण्यात आले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

आरोपी मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा

आर्टीफिशल इंटेलिजन्स चा वापर करून करून तरुणींचे अश्लील छायाचित्रे तयार करणाऱ्या आरोपीला विरारच्या अर्नाळा पोलिसांनी अटक केली आहे. जीत निजाई असा या आरोपीचे नाव असून तो वसईच्या कळम गावात राहणारा आहे. आरोपी हा मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. 

गावातील तरुणींचे अश्लील फोटो तयार केले 

या आरोपीने कृत्रिम बुध्दीमत्तेच्या साहाय्याने म्हणजेच आर्टीफिशल इंटेलिजन्स चा वापर करून मोबाईल वरील टेलिग्राम अँप मध्ये गावातील तरुणींचे अश्लील फोटो तयार केले होते. एका दुसऱ्या मुलाच्या नावाने इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅट वर अकाउंट उघडून त्याने गावातील तरुणींना हे अश्लील फोटो पाठवले होते.

फोटो पाहून पीडित तरुणीला धक्का

व्हायरल झालेले फोटो पाहून पीडित तरुणीला मोठा धक्का बसला.  हा संपूर्ण प्रकार पीडित तरुणींनी अर्नाळा पोलीस ठाण्यात सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को सहित विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांना आरोपीच्या फोन मध्ये गावातील अनेक तरुणींचे फोटो आढळले आहेत. एआय टेक्नॉलॉजीचा वापर केलेला हा महाराष्ट्रातील पहिलाच गुन्हा असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एलॉन मस्क यांनी स्वत:ची नवीन AI कंपनी लाँच केली

ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी आता AI क्षेत्रात पाऊल ठेवलंय. एलॉन मस्क यांनी स्वत:ची नवीन AI कंपनी लाँच केलीय. ही कंपनी चॅटजीपीटी सारख्या AI कंपन्यांना टक्कर देईल. एलॉन मस्क यांनी एक्सएआय या एआय कंपनीची घोषणा केली होती.