Shocking News : एक झोका, चुके काळजाचा ठोका... आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू

Shocking News : नऊ वर्षाची पौैर्णिमा मोठ्या आनंदात झोका खेळत होती. अचानक ती जोरात किंचाळली. घरातील सर्वजण धावत आले. पण, समोर जे दिसल ते पाहून पायाखालची जमीन सरकली. साताऱ्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Mar 21, 2023, 04:12 PM IST
Shocking News : एक झोका, चुके काळजाचा ठोका... आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा: आईच्या डोळ्यादेखत लेकीचा मृत्यू झाला आहे. सातारा (Satara) जिल्ह्यात ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ही लहान मुलगी झोका खेलत होती. यावेळी तिचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला.  संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Shocking News). 

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तडवळे गावात ही घटना घडली आहे.  पोर्णिमा फाळके (वय 9 वर्षे) असे मृत मुलीचे नाव आहे. घरातच मुलीला खेळण्यासाठी झोका बांधण्यात आला होता. हाच झोका मुलीच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. 
झोक्यामध्ये मान अडकल्याने पौर्णिमाचा मृत्यू झाला आहे.पोर्णिमा ही त्यांच्या घरामध्ये झोका खेळत होती. तिने लोखंडी पाइपला साडी बांधली होती.या  साडीमध्ये बसून ती झोका खेळत होती.त्याचवेळी खेळता-खेळता अचानक तिची मान साडीमध्ये अडकली आणि तिच्या गळ्याला फास लागला. 

फास लागल्याने पौर्णिमाने आरडाओरड केला. या नंतर  हा प्रकार तिच्या घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर घरातल्यांनी तिच्या मानेचा फास सोडवून तिला तातडीने वडूज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सागितले. 

झोक्यामुळे 18 वर्षीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

अशाच प्रकारची घटना काही महिन्यांपूर्वी जळगावमध्ये देखील घडली होती.  जळगाव(Jalgaon) शहरातील महाबळ परिसरात झोक्यामुळे 18 वर्षीच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. विधी पाटील असे मृत तरुणीचे नाव आहे. विधी घरातील झुल्यावर झुलत बसली होती. यावेळी घरी कुणीच नव्हते. झोक्याला बांधण्यात आलेल्या नायलॉनच्या दोरीचा विधीच्या गळ्याला फसा लागला. कामानिमित्त घराबाहेर गेलेले विविधीचे आईबाबा तिला फोन करत होते. अनेकदा फोन करुनही विधीने फोन उचलला नाही. यामुळे ते घरी आले. यावेळी विधीला झोक्यामध्य गळफास लागल्याचे त्यांना दिसून आले. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.