चार वर्षाच्या मुलीने सर केला अवघड किल्ला

ठाणे जिल्ह्यातील मोरोशी येथील अत्यंत अवघड असा भैरवगड, अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीने सर केला आहे.

Updated: Dec 23, 2020, 02:53 PM IST
चार वर्षाच्या मुलीने सर केला अवघड किल्ला  title=

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मोरोशी येथील अत्यंत अवघड असा भैरवगड, अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीने सर केला आहे. रूद्राणी गणेश दिघे असं या लहानगीचं नाव आहे. ती पुण्यातल्या जुन्नर तालुक्यामधल्या धोलवड गावची रहिवासी आहे. साह्यगिरी ऍडव्हेंचर ग्रुपने आयोजित केलेल्या मोहिमेत रूद्राणी हिनं ही करामत साधली. 

या चढाईत रूद्राणीसह एकूण चौदा जणांचा समावेश होता. यामध्ये रूद्राणी ही एकटीच सर्वांत लहान होती. अवघड भैरवगड यशस्वीपणे सर केल्यानंतर, रूद्राणीने झेंडा फडकवून मोहीम फत्ते केल्याचा आनंद व्यक्त केला.