Viral Video Grandmother : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका आजीबाईचं (Grandmother video) बार्स करण्यात आले आहे. हे बार्स पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओत एका घरगूती कार्यक्रमाप्रमाणे महिला नटून थटून आल्या होत्य़ा. या महिलांसमोर एक पाळणा देखील होता. हा पाळणा चांगला सजवण्यात आला होता. हा पाळणा एका बाळाच्या बारशासाठी नव्हे तर एका आजी बाईच्या बारशासाठी सजवण्यात आला होता. या घटनेत एका 106 व्या वर्षीय आजीबाईच (Grandmother video) बार्स साजर करण्यात आले आहे.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, या सर्व महिला आजीबाईंना उचलून पाळण्यात ठेवतात. त्यानंतर हा पाळणा हलवतात. आणि अशाप्रकारे या महिला आजीबाईंच बार्स साजर करतात.या बारशाचा व्हिडिओ एकाने कॅमरात कैद केला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.
106 वर्षी परत आले दुधाचे दात; आजीबाईंना पाळण्यात बसवून करण्यात आला बारसा, पाहा व्हिडिओ #ViralVideo #Maharashtra #AajiBai pic.twitter.com/NU7WOPe9kb
— Harshal Jadhav (@harshal_rj) January 2, 2023
106 वर्षाच्या धानव्वा उडगे या आजीबाईंना (Grandmother video) कुटुंबीयांनी पाळण्यात घालून त्यांचं नामकरण केलं.निमित्त होतं आजीबाईना 106 व्या वर्षी दुधाचे दात परत आल्याचे. धानव्वा उडगे यांना 106 व्या वर्षी दुधाचे दात परत आल्याने घरातील महिलांनी पाळणा सजवून,लहान बाळाला प्रमाणे आजीबाईना त्या पाळण्यात बसवून त्यांच बार्स साजर केलं.सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे हा अनोखा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाची सर्वदुर एकच चर्चा आहे.
दरम्यान हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रचंड व्हायरल होत आहे.या व्हिडिओतील कार्यक्रम पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.