94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशिकला होणारं 94 वं साहित्य संमेलन स्थगित

Updated: Mar 7, 2021, 11:14 AM IST
94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित title=

मुंबई: राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्यानं वाढत असतानाच आता साहित्य प्रेमींना नाराज करणारी बातमी येत आहे. आगामी 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग आणि रुग्ण झपाट्य़ानं वाढत असल्यामुळे संमेलन स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.हे साहित्य संमेलन यंदा नाशिकमध्ये पार पडणार होतं.

राज्यात पुन्हा कोरोना वाढत असल्यानं साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साथ ओसरल्यावर पुढील तारखा जाहीर करणार असल्याची माहिती  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनामुळे साहित्य संमेलन घ्यायचं की नाही याबाबत अनेक दिवस चर्चा सुरू आहे. मात्र कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन अखेर मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याबाबत आज मराठवाडा साहित्य परिषदेत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यंदा 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 27 ते 29 मार्च घेण्यात येणार अशी चर्चा होती मात्र कोरोनामुळ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तारखांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यावर तारखा जाहीर करू अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेत घेण्यात आली आहे.