नवी दिल्ली : दिल्लीच्या मालवीय नगरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वायरल झालाय. यामध्ये बाबा का ढाबा नावाच्या दुकानातील आजोबांचा स्टॉल आहे. आजी आजोबांनी मटर पनीर, भात डाळ असं जेवण या स्टॉलवर बनवलंय. पण कोरोना काळात कोणी इथे फिरकत नाही. यामुळे भावूक झालेले आजोबा रडताना दिसत होते. पण हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर आता बाबाचा ढाबावर एकच गर्दी पाहायला मिळाली.
This video completely broke my heart. Dilli waalon please please go eat at बाबा का ढाबा in Malviya Nagar if you get a chance #SupportLocal pic.twitter.com/5B6yEh3k2H
— Vasundhara Tankha Sharma (@VasundharaTankh) October 7, 2020
बाबाचा ढाबावर मटर पनीर खाण्यासाठी दिल्लीकरांनी गर्दी केली आहे. @VasundharaTankh नावाच्या यूजरने बुधवारी संध्याकाळी आपल्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला. ट्वीटरवर आतापर्यंत २.३ मिलियनवेळा हा व्हिडीओ पाहीला गेला आहे.
दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये कांता प्रसाद आणि बादामी देवी अनेक वर्षांपासून बाबा का ढाबा चालवत आहेत. दोघांचं वय ८० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे पण त्यांना कोणी मदत करत नाही. सर्व काम त्यांना स्वत:च करावी लागतात.
हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर अनेक दिग्गज मदतील धावून आले. अभिनेत्री रविना टंडन, सोनम कपूर, स्वरा भास्कर मदतीसाठी आले आहेत. आयपीएलच्या दिल्ली कॅपिटल्सने ट्विटवर व्हिडीओ शेअर करत बाबा का ढाबावर जाण्याचे आवाहन केले.