राय़गड पोषण आहार भ्रष्टाचाराप्रकरणी 8 जणांना अटक

रायगड जिल्ह्यातील खालापुरात पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय... येथे दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला बचतगटाविरोधात गुन्हा दाखल केला असून भ्रष्टाचार करणा-यांचं अटक सत्र सुरु झालंय.. त्यामुळे आता या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झालीये.. 

Updated: Feb 26, 2018, 02:51 PM IST
राय़गड पोषण आहार भ्रष्टाचाराप्रकरणी 8 जणांना अटक title=

रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापुरात पोषण आहारात भ्रष्टाचार झाल्याचं उघडकीस आलंय... येथे दिला जाणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आढळून आलाय. या प्रकरणी पोलिसांनी एका महिला बचतगटाविरोधात गुन्हा दाखल केला असून भ्रष्टाचार करणा-यांचं अटक सत्र सुरु झालंय.. त्यामुळे आता या प्रकरणी अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झालीये.. 

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात एकात्मिक महिला व बाल कल्याण प्रकल्पाचा THR पोषण आहार भ्रष्टाचार उघड झालाय... अंगणवाडी मार्फत दिला जाणारा THR म्हणजेच टेक होम रेशन.. 6 वर्षापर्यंतची मुलं आणि स्तनपान देणा-या तसेच गरोदर मातांना हा पोषण आहार पाकीटबंद स्वरुपात दिला जातो..  

या पाकिटांमध्ये खाऊचं प्रमाण कमी असल्याचं आढळून आलंय.. चौक येथील आदर्श स्वयंसहायता महिला बचत गटाच्या महिला या आहाराचा पुरवठा करतात.. गरोदर मातांसाठी आणि बालकांसाठी THR ची २ किलो पोषण आहाराची पाकिटे येतात.. तशी नोंद या पाकीटांवर असते.. मात्र प्रत्यक्षात  THR ची पाकिटे हि १ किलो पेक्षा कमी वजनाची आढळून आलीत.. 

या बाबतचे वृत्त झी मीडियानं प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं.. खालापूर पोलिसांनी चौकशी सुरु केली आणि खालापूर एकात्मिक महिला व बाळ कल्याण अधिकारी जयपाल गहाणे याच्या सह गोडावून चालवणाऱ्या ३ महिला आणि ४ पुरुष अशा आठ जणांना अटक केली.. या सर्वांना खालापूर न्यायालयात हजर केल्यानंतर २८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ..