'देशातले 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयांवर विश्वास ठेवत नाहीत'

देशातील 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयावर विश्वास ठेवत नाहीत याबाबतची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलीय.  

Updated: Feb 26, 2018, 02:23 PM IST
'देशातले 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयांवर विश्वास ठेवत नाहीत' title=

नाशिक : देशातील 93 टक्के लोक डॉक्टर आणि रुग्णालयावर विश्वास ठेवत नाहीत याबाबतची खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलीय.  

इतकंच नाही  तर मेडिकल कौन्सिलला खाप पंचायतीची उपमा देत असल्याचंही ते म्हणालेत.. वैद्यकीय पेशाची नितिमत्ता खालावल्यानं लोकं असे आरोप करत असल्याचं ते म्हणाले..  नाशिकच्या  सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्षम आमदार पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.. वैद्यकीय शिक्षण मंत्र्याच्या उपस्थितीत अभय बंग यांनी त्यांनाच घरचा आहेर दिल्यानं वैद्यकीय शिक्षणमंत्रीही अवाक  झाले.. 

सार्वजनिक वाचनालयाचा ज्येष्ठ समाजवादीनेते माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना डॉ बंग यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. लाखो जनतेसाठी ते आरोग्य शिबिर घेत आहेत.