Chembur News Today: मुंबईतील चेंबूर येथे एका घराला आग लागून त्यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे चारच्या सुमारास घडली आहे. चेंबूरयेथील सिद्धार्थ नगर येथे ही घटना घडली आहे. गुप्ता कुटुंबीय झोपेत असतानाच ही आगीची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात आणखी एक अपडेट समोर येत आहे. चेंबूर येथील आग ही पेटता दिवा खाली पडल्याने लागल्याचं समोर येत आहे.
चेंबूर येथील सिद्धार्थनगर परिसरात एक दुमजली घर असून या घरातील तळमजल्यावर आगीचा भडका उडाला. पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास घरात दिवा ठेवला होता तो दिवा खाली पडला. पेटता दिवा खाली पडल्याने आगी पकडली गेली. पाहता पाहता आग पसरत गेली. सुरुवातीला घरातील सदस्य छेदाराम गुप्ता हे झोपेतून जागे झाले. त्यांनी आग लागल्याचे पाहताच आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग जास्तच पसरत गेली होती. त्यांनी घरातील सर्व सदस्यांना उठवले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण मजला वेढला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी असलेल्या छेदाराम गुप्ता यांनी दिली आहे.
छेदाराम गुप्ता यांनी बाहेर येऊन लोकांची मदत मिळवण्याचा प्रय़त्न केला. स्थानिकांनी घरातून बाहेर येऊन अग्निशमन दलाला याची माहिती दिली. या आगीच्या विळख्यातून छेदाराम गुप्ता आणि परिवारातील एक सदस्य बचावला आहे. मात्र, कुटुंबातील इतर सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात तीन चिमुकल्यांचाही समावेश आहे.
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथे एका घराला आग लागली यात सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिक युवक आणि अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. तसंच, स्थानिक युवकांनी वेळीच या ठिकाणी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं आजूबाजूला असलेल्या इतर घरांनाही आग लागली नाही. तर स्थानिक युवकांनीच घरांमध्ये मृत पावलेल्या सदस्यांना अग्निशामक दलाच्या मदतीने बाहेर काढले. सकाळी ही आग लागली होती तेव्हा घरामध्ये एकूण नऊ सदस्य होते त्यातले दोन सदस्य खाली झोपले होते. ते बाहेर पडले परंतू इतर सदस्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिथे आग लागली ते घर ग्राउंड प्लस दोन मजले होते. या घरामध्ये गुप्ता परिवार राहत होता ग्राउंड फ्लोअरला दोन जण झोपलेले होते तर वरती पाच जण झोपले असल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशामक दलाला याची माहिती मिळतात अग्निशामकदल घटनास्थळी पोहोचल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला, परंतु आगअधिक भडकत गेली. खालच्या मजल्यावर किराणा दुकान असल्यामुळे त्यामध्ये काही ज्वलनशील सामान सुद्धा होतं. त्यामुळे ही आग भडकतच गेली अग्निशामक दलाने मागच्या बाजूला घराचं छत तोडून जपत मृतदेह बाहेर काढले.