कल्याण-डोंबिवलीकरांच्या चितेंत वाढ, आज सर्वाधिक ६२ रुग्णांची वाढ

गेल्या २४ तासात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Updated: Jun 1, 2020, 08:09 PM IST
कल्याण-डोंबिवलीकरांच्या चितेंत वाढ, आज सर्वाधिक ६२ रुग्णांची वाढ title=

कल्याण : कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंता आता आणखी वाढत आहेत. कारण आज या क्षेत्रात सर्वाधिक ६२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर गेल्या २४ तासात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १०९६ वर पोहोचला आहे. आज वाढलेल्या रुग्णांपैकी, कल्याणमध्ये ३१, डोंबिवलीमध्ये २९, टिटवाळामध्ये २ रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत ३८३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज वाढलेले कल्याणमधील रुग्ण हे संत रोहिदास वाडा, वाडेघर रोड, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, रामबाग लेन २, आधारवाडी रोड, रेतीबंदर, तिसगाव, लोढा गार्डन आणि चिंचपाडा रोड या भागातील आहेत. तर डोंबिवलीमधील रघुवीर नगर, गांधीनगर, दीनदयाळ क्रॉस रोड, आजदे, सुभाष रोड, गुप्ते रोड आणि सोनारपाडा या भागांत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत आज कोरोनाचा रुग्णांची झालेली वाढ ही सर्वाधिक आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना आता आणखी सावध राहावं लागणार आहे. मुंबईत कामाला जाणारे, रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांची संख्या रुग्णांमध्ये जास्त आहे.