शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज

 बिनव्याजी तसेच कालावधी न ठरवता कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Updated: Dec 2, 2018, 03:58 PM IST
शिर्डी संस्थानकडून सरकारने घेतलं ५०० कोटींचं कर्ज title=

शिर्डी : आधीच कर्जाचा डोंगर राज्यावर असताना आता सिंचन प्रकल्पासाठी साई संस्थानने राज्य सरकारला बिनव्याजी ५०० कोटीचं कर्ज दिलयं. हे कर्ज अहमदनगरातील सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यासाठी दिलं असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर अहमदनगरचा पाणी प्रश्न मार्गी लागेल.निळवंडे इथल्या कालव्यासाठी साई संस्थानकडून मिळणाऱ्या या निधीला सरकारकडून हिरवा कंदील मिळालाय. १२५ कोटींचा पहिला हप्ता गोदावरी महामंडळाकडे वर्ग होणार आहे. हा निधी गोदावरी,मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे एक विशेष बाब म्‍हणून वर्ग करण्याबाबतचा निर्णय विधी व न्याय विभागाने जारी केलाय. 

सहमती पत्रावर स्वाक्षरी
 
कोणत्या संस्थेने सरकारला मोठ्या रक्कमेचे बिनव्याजी तसेच कालावधी न ठरवता कर्ज देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या फेब्रुबारीत मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीत प्रस्ताव मंजूर करुन कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आदेश शनिवारी दिले.

 
साई संस्थान आणि गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महांमंडळाने यासाठी सहमती पत्रावर स्वाक्षरी केली आहे. या सिंचन प्रकल्पाचं काम गेल्या काही महिन्यांपासून बंद पडून आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत १२०० कोटी असून संस्थेतर्फे प्रकल्पासाठी ५०० कोटीची मदत देण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

जलसंपदा विभागातर्फे या वर्षाच्या अर्थसंकल्पात सिंचन प्रकल्पासाठी ३०० कोटीची तरतूद केली असून पुढील अर्थसंकल्पात ४०० कोटीची तरतूद केली जाणार आहे. दोन वर्षात या प्रकल्पाचं काम पुर्ण होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच प्रकल्पासाठी संस्थानने ५०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. पण तेव्हा कर्ज वेळेत फेडायची अट होती. या प्रकल्पाचा फायदा अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव आणि शिर्डी या गावांना फायदा होईल.